आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारताकडून 21 हजार टन रासायनिक खतांची मदत
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारतानं नुकतीच 21 हजार टन रासायनिक खतांची मदत पाठवली आहे. भारताच्या उच्चायुक्तांनी श्रीलंकेच्या नागरिकांसाठी विशेष मदतीच्या रूपानं ही खतं नुकतीच औपचारिकरित्या श्रीलंकेकडे सुपूर्द केली. याआधी भारताने गेल्या महिन्यात 44 हजात टन खते मदत म्हणून पाठवली आहेत. यावर्षी आतापर्यंत भारताने श्रीलंकेला 4 दशलक्ष डॉलरची मदत केली आहे. भारताशी सलोख्याचे संबंध असणाऱ्यांना होणारा फायदा तसेच भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेला परस्पर विश्वास आणि उभय देशांमधील सौहार्दाचं दर्शन यातून घडत असल्याचं उच्चायुक्त यावेळी म्हणाले.