राज्य पातळीवरील आरोग्य सुविधांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना जारी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत डिजिटल मिशन अर्थात, ए बी डी एम च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पातळीवरही दवाखाने आणि हॉस्पिटल्स सारख्या आरोग्य सुविधांकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या डिजिटल मोहिमेसाठी नियोजन, तपासणी आणि माहिती तंत्रज्ञान साधने असा ढोबळ आराखडा तयार करण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आर एस शर्मा याविषयी बोलताना म्हणाले की या मोहिमेअंतर्गत आरोग्य सुविधांचं डिजीटाईझशन करुन त्यानंतर देशभरातल्या सर्व आरोग्य सुविधा एकमेकांना जोडून त्याचं एक जाळं तयार करण्यात येईल आणि या सुविधा डिजिटल पद्धतीनं सर्वत्र उपलब्ध होऊ शकतील.