दिव्यांगांसाठीचं पहिलं उद्यान नागपूरमध्ये बांधण्यात येणार – नितीन गडकरी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात दिव्यांगांसाठीचं पहिलं उद्यान नागपूरमध्ये बांधण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली. या उद्यानाचं आरेखन पूर्ण झालं असून दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहितीही त्यांनी दिली.
नागपूर इथं दिव्यांगांना सहायक साधनांचं वितरण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं; त्यावेळी ते बोलत होते. या उद्यानात दिव्यांगाच्या बौद्धिक वाढीसाठी तसंच मनोरंजनासाठी अॅकॉस्टिक रुम, लोकोमोटर सुविधा, सुगमतेसाठी बॅटरी कार, व्हिलचेअर, रेलिंगची व्यवस्था, गंध आणि स्पर्शावरुन ओळखता येणारी पुष्पवाटीका असणार आहे.