औषध उत्पादन निर्यातीमधे यंदाच्या एप्रिल ते जुलै कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या औषध उत्पादन निर्यातीमधे एप्रिल ते जुलै २०१३-२०१४ या कालावधीच्या तुलनेत यंदाच्या त्याच कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१३-२०१४ मधे २० हजार ५९६ कोटी रूपयांची निर्यात झाली तर यंदाच्या एप्रिल ते जुलै या कालावधीत ती ५० हजार कोटी रूपयांहून अधिक झाल्याचं केंद्रीय डॉ.मनसुख मांडविय यांनी सांगितलं. भारत फक्त नविनता आणि रोजगार निर्मितीचा मोठा स्त्रोत नाही तर तो जागतिक पातळीवर गरज असेल तर आरोग्यविषयक सेवासुविधा पुरवणारा देश बनला आहे, असं ते म्हणाले.