दर्जेदार औषध निर्मिती आणि जागतिक बाजारपेठेतला हिस्सा वाढवण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं औषध उद्योगाला आवाहन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी औषध निर्मिती क्षेत्राला दर्जेदार औषधं निर्माण करण्याचं आणि जागतिक बाजारातला त्यांचा वाटा वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय औषध निर्मिती किंमत निर्धारण प्रधिकरणाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. जगात दर्जेदार औषध निर्मिती करणारा देश म्हणून भारताची प्रतिष्ठी वाढलेली असून औषधं निर्मिती कंपन्यांनी या क्षेत्रात आता संशोधनावर भर देण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. भारतीय आरोग्य उद्योगानं जागतिक बाजाराचा विश्वास संपादन केला असून आता भारत जगाच्या औषधं निर्मितीचं केंद्र झाला आहे असंही ते म्हणाले. औषधांच्या निर्यातीत वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं.