नवी दिल्ली : ग्राम स्तरावर आदिवासी समुदायांसाठी डिजिटल युवा नेतृत्व करण्यासाठी युवतींना प्रोत्साहन मिळावे. त्यांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या GOAL अर्थात गोल (गोईंग ऑनलाईन ॲज लीडर्स) या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी जाहीर केला.
मार्चमधे सुरु करण्यात आलेल्या ‘गोल’च्या पहिल्या टप्प्यात वंचित आदिवासी युवतींना डिजिटल आणि कौशल्य शिकण्यासाठी व्यापार, फॅशन कला या क्षेत्रातल्या मेंटॉरचे मार्गदर्शन देण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात आदिवासी मंत्रालय आणि फेसबुक एकत्रितपणे देशातल्या आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या 5000 युवतींना मेंटॉरद्वारे मार्गदर्शन करणार आहे.