नवी दिल्ली : सेवा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्मात्याची सृजनशीलता आणि कल्पकता यासंदर्भातल्या उल्लंघनापासून सुरक्षितता देण्यासाठी सरकार कटिबद्ध असलयाचे वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी या उद्योग क्षेत्राला दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेने मिपकॉम 2019 मधे कान्स इथे भारताचा बौद्धीक संपदा मार्गदर्शक सादर केला. त्यात सचिवांनी हा संदेश दिला आहे.
160 देशात प्रसिद्ध असलेल्या साठपेक्षा अधिक भारतीय बौद्धीक संपदांची यात सूची आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात बौद्धीक संपदा ही त्याच्या निर्मात्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. उद्योगाच्या भावी विकासाचा केंद्रबिंदू या दृष्टीने बौद्धीक संपदा अधिकारांचे महत्व असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.