देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. दुसऱ्या देशातून भारतात येणाऱ्या वाहनांसाठी मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे.
इतर देशात नोंदणी केलेल्या वाहनांसाठी अधिनियम लागू करण्यात आले आहेत. अशा वाहन चालकांकडे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र, वाहन परवाना, विमा आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असणं अनिवार्य असून अधिसूचनेतल्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल.