नवी दिल्ली : सामाजिक आणि वर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी योग्य आहार घेण्यासंदर्भातले ‘इट राईट इंडिया’ अभियान महत्वपूर्ण असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. जागतिक अन्न दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी फूड सेफ्टी मित्र योजनेचे उद्घाटन त्यांनी केले. अन्नाची नासाडी टाळावी, कमी आहार, योग्य आहार आणि आरोग्यदायी आहार हा गांधीजींचा संदेश जनतेने आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
अन्न सुरक्षाविषयक कायद्यांचे पालन, स्वच्छता निकष, प्रशिक्षण, परवाना, नोंदणी यासारख्या बाबींमधे फूड सेफ्टी मित्र, लहान आणि मध्यम खाद्यान्न व्यावसायिकांना मदत करतील.