Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘ढोल पथकांच्या मागणीत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘ढोल पथकांची’ मागणी वाढली आहे. मुंबईत यावर्षी ढोल-ताशा पथकांची संख्या पाचशे पेक्षा अधिक झाली आहे. संस्कृती जोपासण्याच्या उद्देशानं  २००५ साली सुरू झालेलं ‘गिरगाव ध्वज पथक’ हे मुंबईतील सर्वांत पहिलं पथक म्हणून ओळखलं जातं.

दरवरषी मुंबईत २० ते २५ नवी पथकं तयार होतात.  सध्या पुणे आणि आसपासच्या परिसरातली काही ढोल-ताशा पथकंही यंदा मुंबईत दाखल झाली आहेत. एका सुपारीसाठी या पथकांना दहा हजारांपासून ४० ते ५० हजारांपर्यंत मानधन मिळतं. यातील काही ढोल-ताशा पथकं  मिळालेलं  मानधन सामाजिक कार्यासाठी वापरतात. काही ढोल ताशा पथकं महिलांकडून चालवली जातात.

Exit mobile version