Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रवी नारायण बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण यांना बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. नारायण हे एप्रिल 1994 ते 31 मार्च 2013 पर्यंत राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

त्यानंतर, एक एप्रिल 2013 ते एक जून 2017 पर्यंत त्यांची बिगर कार्यकारी श्रेणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने सहा मार्च रोजी तर फोन टॅपिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने 14 जुलै रोजी अटक केली होती.

Exit mobile version