भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत – संरक्षण मंत्री
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन उंचीवर नेण्यासाठी आवश्यक उपकरणांच्या मजबूत, सुरक्षित आणि जलद पुरवठ्यावर भर दिला आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या लॉजिस्टिक परिसंवादाला संबोधित करताना बोलत होते.
भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. भविष्यात युद्ध आणि प्रशासकीय क्षेत्रासह विविध भागात उपकरणांचा पुरवठा सुरळीत राखणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि कृतीशील पध्दतींमध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाची धोरणे आखली आहेत असही त्यांनी सांगितलं.