नवी दिल्ली : गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या वॉशिंग्टन इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. भारतात भांडवलदारांनाही सन्मानाची वागणूक देणारी लोकशाही आहे. शिवाय भारताकडे उत्कृष्ट कौशल्यही उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली झपाट्यानं पुढं निघालेली अर्थव्यवस्था ठरली आहे, असं त्या म्हणाल्या.
आर्थिक सुधारणांच्या दिशेनं सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्व क्षेत्रांशी सरकार दर आठवड्याला चर्चा करत आहे, तसंच गुंतवणूकदार आणि कार्पोरेट क्षेत्राबाबत कोणत्याही प्रकारचं अविश्वासाचं वातावरण भारतात नाही. शिवाय दबाव असलेल्या क्षेत्रांमधले प्रश्न सोडवण्यासाठी सरकार उपाय-योजनाही करत आहे, असं सीतारामन यांनी गुंतवणूकदारांना सांगितलं.