मुंबई (वृत्तसंस्था) : ऑटोरिक्षा-टॅक्सी संघटनांनी येत्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणारा संप स्थगित करण्यात आल्याचं मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले आहे. काल मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांच्याशी चर्चा केली उद्य सामंत यांनी त्यांना भाडेवाढ करण्याचं आश्वासन देऊन दहा दिवसांची मुदत मागितली आहे.
याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहेत. या आश्वासनानंतर हा संप स्थगित करण्यात आला आहे. पेट्रोल आणि सीएनजी दरात वाढ करण्यात आल्यानं ऑटोरिक्षा- टॅक्सीच्या भाड्यात सुधारीत भाडेवाढ लागू करण्यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा-टॅक्सी संघटनेकडून करण्यात आली आहे.