Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीच्या मूल्यं आणि तत्वांबद्दल जागरूकता निर्माण करून लोकशाही बळकट करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो. लोकशाही, शांतता आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याला असणारं महत्त्व हा यावर्षीच्या लोकशाही दिनाचा विषय आहे असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

जगभरात लोकशाही मागे पडत असून समानता, समावेश आणि एकता या लोकशाहीच्या तत्त्वांसाठी उभं राहण्याची ही वेळ आहे असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी लोकशाही दिनाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त म्हटलं आहे.

Exit mobile version