तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्रीवर बंदी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ तसंच सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. १७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान मंदिराच्या दोनशे मीटर परिसरात हा नियम लागू असेल, भाविकांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन तहसिलदार तथा मंदिर संस्थानाच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी केलं आहे.
दरम्यान, तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला येत्या १७ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. २६ तारखेला पहाटे देवी पुन्हा सिंहासनारूढ होऊन घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे.