मुंबई : नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत तिसऱ्या भारत-डच पोर्ट फोरमचे उद्घाटन हॉटेल ट्रायडेंट येथे करण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चेत जलद व टिकाऊ बंदर विकास, पर्यावरणाचे संरक्षण, समुद्री शिक्षण व धोरण इ. मुद्द्यांवर भर देण्यात आला.
शाही दांपत्याने समुद्री शिक्षण या मुद्द्यावर भर असलेल्या चर्चेत सहभाग घेतला. त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीत समुद्री शिक्षणासंबंधी लेटर ऑफ इंटेंट (एलआयओ) व महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व रॉटर पोर्ट यांच्यातील सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.
व्हिएनओ-एनसीडब्लूचे उपसंचालक इनेक दिझेन्त्ज हॅमिंग व मुंबई बंदर व भारतीय बंदर प्राधिकरणाचे चेअरमन श्री. संजय भाटिया यावेळी उपस्थित होते.