व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेने लहान उद्योजक आणि स्टार्ट अप्सना चालना देण्यासाठी आपल्या व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी पुढाकार घेतला आहे. या लिलाव प्रक्रियेतून २२ कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे १३७ करार करण्यात आले आहेत. असे ई लिलाव करणारा मध्य रेल्वे हा पहिला विभाग ठरला आहे. ई-लिलाव पोर्टलमुळे रेल्वेचं उत्पन्न वाढलं आहे तसंच लहान उद्योजकांना चालना देण्यासोबतच मालमत्तेचं खरं मूल्य कळण्यास मदत झाली आहे.