Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अनोळखी क्रमांकावर येणारे व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडीओ न स्वीकारण्याचं केंद्रीय यंत्रणेचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल किंवा व्हिडीओ संदेश पाठवून व्हायरस हल्ला करण्याचे प्रकार नजिकच्या काळात उघड झाले आहेत. या माध्यमातून समाज विघातक व्यक्ती किंवा संघटना कॉल केलेल्या व्यक्तीच्या मोबाइलमध्ये काही सॉफ्टवेअर टाकतात आणि त्याआधारे त्या व्यक्तीचा किंवा त्याच्या ओळखीतल्या लोकांची माहिती, बँक खात्याचं विवरणाची चोरी केली जाते. त्यामुळं अनोळखी व्यक्तीने केलेला व्हीडीओ कॉल किंवा अनोळखी क्रमांकावर आलेला व्हिडीओ डाऊनलोड करू नये असं आवाहन केंद्र सरकारच्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनं केलं आहे. तसंच हे प्रकार टाळण्यासाठी व्हॉट्सअपने वेळोवेळी दिलेले अपडेट इन्स्टॉल करावे.

Exit mobile version