Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अर्थमंत्रालयाकडून ३ दशांश टक्क्यांपर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयानं घेतला आहे. २ वर्ष कालावधीच्या योजनांसाठी आता साडे ५ ऐवजी ५ पूर्णांक ७ दशांश टक्के तर ३ वर्ष कालावधीच्या योजनांसाठी साडे ५ ऐवजी ५ पूर्णांक ८ दशांश टक्के दरानं व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ७ पूर्णांक ४ टक्क्यांऐवजी ७ पूर्णांक ६ दशांश टक्के आणि मासिक उत्पन्न योजनेवर ६ पूर्णांक ६ टक्क्यांऐवजी ६ पूर्णांक ७ टक्के दरानं व्याज मिळेल. किसान पत्रावर ६ पूर्णांक ९ टक्क्यांच्या ऐवजी ७ टक्के दरानं व्याज मिळेल. १२४ महिन्यांच्याऐवजी १२३ महिन्यात याची मुदतपूर्ती होईल. PPF अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर मात्र पूर्वीप्रमाणे अनुक्रमे ७ पूर्णांक १ टक्के आणि ७ पूर्णांक ६ टक्केच राहणार आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२२ या तिमाहीकरता हे दर लागू राहतील.

Exit mobile version