राज्यपालाकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी स्वतंत्र कुलगुरु निवड समित्या गठीत
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरता कर्नाटक उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शुभ्र कमल मुखर्जी, तर कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ प्रदीप कुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली आहे.