स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर एका जोडणीवर आता एका वर्षात एकूण १५ सिलेंडर्स तर एका महिन्यात दोन सिलेंडर्स देण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या संदर्भात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांना, वर्षभरात अमर्यादित सिलेंडर्स मिळत होते. अनुदानित घरगुती गॅस जोडणी धारकांना वर्षभरात फक्त १२ सिलेंडर्स मिळणार असून, त्याहून अधिक सिलेंडर्सची गरज भासल्यास जास्तीचे सिलेंडर्स विनाअनुदानित दरानं घेता येईल. सिलेंडर संदर्भातल्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून, याची तातडीनं अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी करण्यासंदर्भातील अनेक तक्रारी येत असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.