खाद्य तेलांवरील आयात शुल्क सवलतीत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढ
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने खाद्य तेलांवरील आयात शुल्काची सवलत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत तेलाचा पुरवठा वाढवणं आणि किंमती नियंत्रणात ठेवणं, हा या निर्णयामागचा उद्देश आहे. खाद्यतेलाचे जागतिक स्तरावरील घसरलेले दर आणि कमी आयात शुल्क यामुळे भारतातही खाद्यतेलाच्या किरकोळ किंमतीतही मोठी घसरण झाली आहे.