अहमदाबाद राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधे महाराष्ट्राला महिला खोखोचं सुवर्णपदक
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज महाराष्ट्रानं महिलांच्या खोखो स्पर्धेत सुवर्ण पदक पटाकवलं आहे. महिला संघानं ओडिशाचा २ गुणांनी पराभव केला या स्पर्धत आतापर्यंत च्या पदकतालिकेनुसार सेना दल ६८ पदकांसह आपलं पहिल्या स्थानावर आहे. यामध्ये ३२ सुवर्ण, १८ रौप्य आणि १८ कांस्य पदकाचा समावेश आहे. २३ सुवर्णपदकांसह हरियाणा दुसऱ्या स्थानी तर १४ सुवर्ण पदक विजेता महराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. हरियाणानं एकूण ५८ पदकं मिळवली असून यात २३ सुवर्ण, २० रौप्य आणि १५ कांस्य पदकांचा समावेश आहे. तर महाराष्ट्राला १४ सुवर्ण, १५ रौप्य आणि ३१ कांस्य पदकांसह एकूण ६० पदकं मिळाली आहेत. महाराष्ट्रानं १४ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. ३२ सुवर्णपदकांसह सैन्य दलं पहिल्या आणि आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी १४ सुवर्ण, १५ रौप्य आणि ३१ कांस्य अशा ६० पदकांची कमाई केली आहे. आजच्या ३५ किलोमिटर चालण्याच्या शर्यतीत उत्तर प्रदेशच्या राम बाबूनं सुवर्ण पदकं जिंकलं असून तिरंदाजीत राजस्थाननं नागालॅंजचा ३ – १ एक पराभव करत कांस्य पदकं जिंकलं आहे. महिलांच्या तिरंदाजीमध्ये गुजरातच्या संघानं झारखंडचा ५-३ असा पराभव करुन कांस्य पदक जिंकलं आहे. यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धा गुजरातमधल्या ६ शहरांमध्ये खेळवल्या जात आहेत. येत्या १२ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे.