Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटलं आहे की, काही विकसित देशांमध्ये अर्थव्यवस्थेतील मंदी आणि परिणामी मागणीतील मंदीमुळे काही क्षेत्रांतील निर्यातीत घट झाली आहे. बिगर पेट्रोलियम आणि बिगर – रत्ने आणि जवाहिऱ्यांची निर्यात या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरमध्ये १५८ अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५.५३ टक्क्यांनी वाढली आहे. मंत्रालयानं सांगितलं की, देशानं या वर्षी सप्टेंबरमध्ये ३२ अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्यापारी मालाची निर्यात केली असली तरी गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत निर्यातीत ३.५२ टक्क्यांनी घट झाली आहे.

Exit mobile version