स्वच्छता अभियानाअंतर्गत आकाशवाणी मुंबईत कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हाती घेण्याचा मानस
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाअंतर्गत आकाशवाणी मुंबईत कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. परिसरात असलेल्या झाडांची पानं, इतर वस्तूंचा उपयोग यासाठी होईल. वृत्तविभाग प्रमुख सरस्वती कुवळेकर यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला अभियांत्रिकी विभागप्रमुख रमेश घरडे यांनी तत्वतः मान्यता दिली. यामुळं कार्बन उत्सर्जन कमी व्हायला मदत होईल आणि परिसरातली स्वच्छता वाढेल असं ते म्हणाले. काल आणि आज मुंबई आकाशवाणीचे प्रांगण स्वच्छ करणे तसंच अनावश्यक कागदपत्र आणि अनावश्यक वस्तू निकालात काढण्याचे काम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पुढाकाराने हाती घेतले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत ई-कचरा व्यवस्थापनासह इतरही उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.