Site icon साप्ताहिक एकच ध्येय

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसमधले मानवाधिकार कार्यकर्ते ॲलेस बेलयात्स्की यांना जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेलारुसमधले मानवाधिकार कार्यकर्ते ॲलेस बेलयात्स्की यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. बेलयत्सकी हे बेलारुस मधे ८० च्या दशकात झालेल्या लोकशाही चळवळीचे प्रणेते असून वायसना ही त्यांची संघटना जगभरात हुकूमशाहीविरोधात लढणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करते. याखेरीज आणि रशियातली मेमोरियल आणि युक्रेनमधली सेंटर फॉर सिव्हल लिबर्टीज या  स्वयंसेवी संस्था यंदा नोबेल शांतता पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. मेमोरियल ही रशियात १९८७ मधे स्थापन झालेली  संघटना मानवाधिकारांसाठी काम करते, सेंटर फॉर सिव्हल लिबर्टीज ही २००७ मधे क्यीव इथं स्थापन झालेली संघटना युक्रेनमधे लोकशाही  मानवाधिकार रक्षणासाठी कार्य करते.

Exit mobile version