Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१८ कोटी ९० लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज  सकाळपासून सुमारे पावणे तीन लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१८ कोटी ९० लाखाच्या वर गेली आहे. त्यात २१ कोटी ३७ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून ८ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७२ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ९१ लाख ९१ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

Exit mobile version