यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या फेडरल बँकेचे माजी अध्यक्ष बेन एस बर्नांके, तसंच डग्लस डबल्यू डायमंड आणि फिलिप एच डिबविग यांना जाहीर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या फेडरल बँकेचे माजी अध्यक्ष बेन एस बर्नांके, तसंच डग्लस डबल्यू डायमंड आणि फिलिप एच डिबविग या अमेरिकी अर्थशास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. बँका आणि वित्तीय संस्थापुढच्या संकटांबाबत त्यांनी केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. रॉयल स्वीडिश अॅकडमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल निवड समितीनं स्टॉक होम इथं आज ही घोषणा केली. १ कोटी स्वीडिश क्रोन इतक्या रोख रकमेचा हा पुरस्कार आहे.