आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमेरिकेला रवाना
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत.
या दौऱ्यात त्या जी-वीस समुहातील देशांच्या अर्थमंत्र्यांसोबतही चर्चा करणार आहेत. याशिवाय जपान, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, भूतान, न्यूझीलंड, इजिप्त, जर्मनी, मॉरिशस, यूएई, इराण आणि नेदरलँडसह अनेक देशांसोबतच्या द्विपक्षीय बैठकींमध्येही त्या सहभागी होणार आहेत.
देशाच्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांना अधोरेखित करणं आणि परकीय गुंतवणुकीला सुलभ करण्यासाठीच्या उपाययोजनांवर विचार करणं हा या बैठकींचा उद्देश असेल.