नवी दिल्ली : ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी मांडलेल्या ब्रेक्झिटच्या नव्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान करण्यासाठी ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचं विशेष अधिवेशन होणार आहे.
आपण मांडलेल्या प्रस्तावापेक्षा अधिक चांगलं काही असू शकत नाही, त्यामुळे सर्व खासदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन बोरीस यांनी काल केलं होतं.
सभागृहात बोरीस यांच्या हुजूर पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे हा प्रस्ताव संमत करून घेण्यासाठी बोरीस यांना इतर पक्ष तसंच अपक्ष खासदारांवर अवलंबून राहावं लागणार आहे.
हा प्रस्ताव संमत झाला नाही तर, बोरीस यांना थेरेसा मे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार युरोपीय महासंघाकडे ब्रेक्झिटच्या प्रक्रियेसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मागावी लागणार आहे.