नवी दिल्ली : कुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीम याचा साथीदार इक्बाल मिर्चि याच्याविरुद्ध कारवाईत सक्तवसुली संचालनालयाने मुंबईतल्या डझनभर आस्थापनांवरर छापे टाकले. हे छापे दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन संबंधित असून, काळा पैसा पांढरा करण्यासंदर्भात या कपंनीनं इक्बाल मिर्चिचा संबंध असलेल्या सनब्लिंक रिअल इस्टेट कंपनीला दोन हजार 186 कोटीचं कर्ज वितरण केल्याप्रकरणी आहेत.
दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीन मात्र या प्रकरणातल्या गैरव्यवहाराशी आपला काही संबंध नसल्याची भूमिका घेतली आहे. इक्बाल मिर्चिचा 2013 मध्येच लंडन मध्ये मृत्यू झाला आहे.