Site icon साप्ताहिक एकच ध्येय

थॅलीसिमिया, सिकलसेल, बोन मॅरो यासारख्या आजारांसाठी नागपूरातील एम्सनं आग्रही असायला हवं, अशी नितीन गडकरी यांची भुमिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थॅलीसिमिया, सिकलसेल, बोन मॅरो यासारख्या आजारासाठी एम्स नागपूरमधे निदान व्हावं आणि त्याचा लाभ विदर्भातील जनतेला व्हावा यासाठी एम्सनं आग्रही असायला हवं, अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते नागपूरच्या मिहान येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था – एम्सच्या शरीरविज्ञान विभागाद्वारे आयोजित आठव्या ‘असोपीकॉन -२०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान असोसिएशन ऑफ फिजीओलॉजिस्ट ऑफ इंडिया – असोपीआय या संघटनेव्दारे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विदर्भातील गरीब जनतेला सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचार सेवा- सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून याच प्रयत्नातून एम्स नागपूरची स्थापना झाली आहे. यकृत, हृदय, किडनी प्रत्यारोपणाची सुविधा एम्स नागपूर मधे उपलब्ध होऊन अवयव प्रत्यारोपण संबधी जनजागृती होणं तसंच यावर विस्तृत संशोधन आणि उत्तम यंत्रणा स्थापित होणं गरजेचं आहे असं गडकरी म्हणाले. डॉक्टरांची कमतरता हा एक गंभीर विषय असून देशात वैद्यकीय महविद्यालयाची संख्या वाढली तर या समस्या आटोक्यात आणता येईल. उत्कृष्ट उपचार सेवेसाठी नागपूर एम्स सदैव आग्रही असून या परिषदेचा पुरेपूर फायदा विद्यार्थी, तज्ञ यांना होईल अशी आशा एम्स नागपूरच्या संचालिका मेज. जनरल विभा दत्ता यांनी यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version