Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा केल्या जप्त

पुणे (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयानं विकसित केलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा जप्त करून संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १२ ऑक्टोबरला पुणे सीमा शुल्क अधिकार्‍यांच्या समन्वयानं करण्यात आली. महसूल गुप्तचर अधिकार्‍यांच्या पथकाने याबाबत त्वरीत कारवाई करून एका व्यक्तीला पकडलं. सीमा शुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदीअंतर्गत प्रत्येकी ५००/- रुपयांच्या एकूण ४०० बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी करण्यात आली होती ज्याचं दर्शनी मुल्य २ लाख रुपये होते अशा नोटा जप्त करण्यात आल्या असून याबाबत सखोल चौकशी सुरु आहे.

Exit mobile version