मत्स्य उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे- डॉ. एल मुरुगन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मत्स्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने गेल्या आठ वर्षांत मत्स्य उत्पादन, निर्यात आणि मासेमारीसाठीच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पावले उचलली.परिणामी मत्स्य उत्पादनात देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे असं केंद्रीय मत्स्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री एल मुरुगन यांनी सांगितलं. ते बंगळुरु इथं आंतरदेशीय मत्स्य संमेलनाच्या समारोपाच्या वेळी बोलत होते. कर्नाटकात २०२१-२२ या वर्षात मत्स्यउत्पादन २०१९-२० च्या तुलनेत ७६ टक्केनी वाढले असंही त्यांनी नमूद केलं. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे कर्नाटकात एक लाख चाळीस हजारांहून अधिक रोजगार संधी निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलं.