केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रीय पोलीस स्मृतीदिनानिमित्त दिवंगत पोलिसांना आदरांजली
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : पोलिस स्मृतिदिन पोलिस दलात कर्त्तव्य बजावताना ज्या कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले अशा दिवंगत पोलिस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं आदरांजली वाहिली. मुंबईतल्या नायगाव पोलिस मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण ६२ पोलीस अधिकारी आणि २०२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.