प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेमुळे आठ वर्षांत देशभरातील नागरिकांची १८ हजार कोटी रुपयांची बचत झाली- केंद्रीय आरोग्यमंत्री
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परीयोजनेमुळे रुग्णांवर होणाऱ्या अतिरीक्त खर्चात मोठी बचत झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. या योजनेमुळे गेल्या आठ वर्षांत देशभरातील नागरिकांची १८ हजार कोटी रुपयांची बचत झाली असल्याचं ट्विट मांडवीय यांनी केलं आहे.
देशातील सर्व नागरिकांना उच्च प्रतीची आणि परवडणाऱ्या दरातली आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही मांडवीय यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
नागरिकांना उच्च प्रतीची औषधं परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावी यासाठी २००८मध्ये ही योजना सुरु केली गेली होती. याअंतर्गत देशभरातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात मिळून ८ हजार हजार सातशेपेक्षा जास्त जन औषधी केंद्र उभारली गेली आहेत.