मुुंबई : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला आहे. याचबरोबर सातारा आणि बिहारमधल्या समस्तीपूर या दोन लोकसभा आणि सतरा राज्यांमधील ५१ जागांसाठीचा पोटनिवडणुकीचा प्रचार देखील आज संपला.
या सर्व ठिकाणी २१ तारखेला मतदान होणार असून मतमोजणी २४ ऑक्टोबरला होईल. या विधानसभा निवडणूकीबरोबरच दोन लोकसभा पोटनिवडणूका त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातल्या ११, गुजरातमधल्या ६ केरळ आणि बिहारमधल्या प्रत्येकी ५, सिक्किममधल्या ३, पंजाब आणि आसाम मधल्या ४ तर तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मेघालय, पुदुचेरी आणि अरूणाचल प्रदेशमधल्या प्रत्येकी दोन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकाही होत आहेत.
हरियाणात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रीय लोक दल, जन नायक जनता पार्टी, यांनी राज्याच्या विविध भागात प्रचार केला. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी सिरसा जिल्ह्यातल्या इलिनाबाद इथं प्रचार सभा घेतली. मुख्यमंत्री मनोहरलाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हरियाणात अनेक विकासकामे केली आहेत असं ते म्हणाले.
५५० व्या प्रकाश पर्वासाठी कर्तारपूर कॅरिडॉर तयार आहे असंही ते म्हणाले. जल मंत्रालयाच्या निर्मितीविषयीही त्यांनी मतदारांना अवगत करून पाकिस्तानकडे जाणाऱ्या नद्यांचे पाणी हरियाणा आणि इतर राज्यांना मिळेल असंही त्यांनी सांगितलं. कलम 370 हटवण्याला विरोध केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर टीका केली.