नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकैय्या नायडू यांनी डी.एन.ए. तंत्रज्ञान नियमन विधेयक संसदेच्या विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन स्थायी समितीकडे विचारार्थ पाठवलं आहे.
या विधेयकात एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डी.एन.ए. तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याविषयी तसंच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर डी.एन.ए. विषयीचा माहितीसाठा निर्माण करण्यासाठीच्या तरतुदी आहेत.