देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं थंडीचा कडाका कमी राहणार असून, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी राहील. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्र यांनी दिली. कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अलिबाग इथं ३४ पूर्णांक ८ दशांश, तर सर्वात कमी किमान तापमान जळगाव इथं १२ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील.