नवी दिल्ली : आर्थिक प्रगती आणि विकासाची हमी देणारं वातावरण तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठक त्या बोलत होत्या.
गेल्या वर्षी वित्तीय तूट ३ पूर्णांक ४ दशांश टक्के होती. ती २०१९-२० या वर्षात ३ पूर्णाक ३ दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे, असं त्या म्हणाल्या. आर्थिक विकास मंदीचा सामना करण्यासाठी विविध योजनांचा आराखडा केंद्र सरकार तयार करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत परकीय थेट गुंतवणूकीत ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे, पायाभूत सुविधा आणि उद्योगात खाजगी क्षेत्रातल्या गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी कॉपोरेट करात कपात केली आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.