Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालची विजयी सुरुवात

नवी दिल्ली : चीनमधल्या वुहान इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालनं पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटातील आपला पहिला सामना जिंकला आहे. पंघालनं ब्राझीलच्या डगलस अंद्रादेचा ४-१ असा पराभव केला.

५६ किलो वजनी गटात भारताच्या चिरागनं जांबियाच्या कटंगा क्रिस्टोफरचा ५-० असा पराभव केला. पुरुषांच्या ४९ किलो वजनी गटात दिपकनं इराणच्या अबझादेह अलीचा तर सतीश कुमारनं ब्राझीलच्या कॉस्मेला पराभूत केलं. मात्र, ६४ किलो वजनी गटात संदिप कुमारचा उजबेकिस्तानच्या रासुलोव जखोनगीरनं ०-५ असा पराभव केला.

तर हर्ष लकाराचं ८१ किलो वजनी गटातील आव्हानही काल संपलं. या स्पर्धेत भारताच्या ५४ खेळाडूनी सहभाग घेतला असून, जागतिक सैन्यदल स्पर्धेत १०९ देशातील ९ हजार ३०८ सैन्य दलातील खेळाडू सहभागी झाले आहेत.

Exit mobile version