मुुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांनी काल मुंबईतल्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाजवळ निदर्शनं केली. १०० हून अधिक महिलांसह ज्येष्ठ नागरिक खातेदार यावेळी हातात फलक घेऊन अडकलेले सर्व पैसे परत देण्याची मागणी करत होते.
पोलीसांनी या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. पीएमसी बँकेतील घोटाळा उघड झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं सुरुवातीला केवळ १ हजार रुपये आणि नंतर ४० हजारापर्यंत रक्कम काढण्याची मुभा दिली आहे. याप्रकरणात एचडीआयएल च्या प्रवर्तकांसह अन्य पाच जणांना अटक करण्यात आली आहे.