Site icon साप्ताहिक एकच ध्येय

डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य अर्थात आभा कार्ड नावाचं डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू केले असून या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार आदी माहिती डिजिटल स्वरुपात साठविली जात आहे. कार्डधारक व्यक्ती ही माहिती केव्हाही आपल्या मोबाइलवर एका क्लिकवर बघू शकतात. एक वर्षाच्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच ‘आभा’ हेल्थ कार्ड काढणं शक्य असून ते पूर्णतः निःशुल्क असल्याची माहिती प्रधानमन्त्री आयुष्मान भारत योजना विभागाच्या वतीने  दिली आहे.

अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी आतापर्यंत 2 लाख 60 हजार ABHA हेल्थ कार्ड काढले असून यामुळे एका क्लिकवर वैद्यकीय माहिती उपलब्ध होत असल्यामुळे हे कार्ड नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. यामुळे देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कार्डसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

Exit mobile version