श्रीनगरच्या डल सरोवरमध्ये भारताचे पहिले फ्लोटिंग वित्तीय साक्षरता शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी केली इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची प्रशंसा
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : श्रीनगरच्या डल सरोवरमध्ये भारताचे पहिले फ्लोटिंग वित्तीय साक्षरता शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची प्रशंसा केली आहे. IPPB च्या ट्विटला प्रत्युत्तर देताना, मोदी यांनी एक अद्भुत उपक्रम असं या शिबीराचं वर्णन केलं आहे. हे वित्तीय साक्षरता शिबीर महिला सक्षमीकरणाला पुढे नेईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘निवेशक दीदी’ नावाच्या उपक्रमांतर्गत आयोजित या शिबिरात महिलांच्या दृष्टीकोनाचा अवलंब करून आर्थिक जागृती निर्माण करण्यावर भर देण्यात आला होता.