नाशिकमधलं सिडकोचं कार्यालय बंद करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमधलं सिडकोचं कार्यालय बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नाशिक मध्ये १९७० मध्ये सिडकोची स्थापना झाली. नाशिकमध्ये सिडकोनं आत्तापर्यंत सुमारे तीस हजार घरं बांधली असून, खाजगी विकासकांच्या मार्फत वीस हजार घरं बांधली आहेत.
सिडकोच्या गृहनिर्माण संस्था आता नाशिक महापालिकेकडे हस्तांतरित केल्या आहेत. सध्या नाशिकमध्ये सिडकोचा कोणताही प्रकल्प सुरू नाही. म्हणूनच सिडकोचं स्थानिक कार्यालय बंद करण्याचे आदेश शासनानं दिला आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवल्यानंतरच कार्यालय बंद करावं अशी मागणी नाशिकमधल्या जागा मालकांनी केली आहे.