सांगलीच्या पेठ नाका ते सांगली महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी ६११ कोटी रुपये मंजूर
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते सांगली या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ६११ कोटी रुपये मंजूर केले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सांगली जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग सध्या दुपदरी असून तो आता चौपदरी केला जाणार आहे. या रस्त्यामुळे सांगली हे जिल्हा ठिकाण कोकण, कर्नाटक, मराठवाडा आणि मुंबई बरोबर महामार्गाने जोडले जाणार आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं कांम तातडीनं सुरू केलं जाणार असल्याचंही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितलं.