Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्यात सध्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारित दिव्यांग कल्याण आयुक्तालय कार्यरत असून दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांच्या खर्चासाठी १ हजार १३० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पित केली आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार उभारण्याची घोषणा देखील मुख्यमंत्रयांनी केली. दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या  शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्याची घोषणा  शिंदे यांनी यावेळी केली. तसंच यापुढे  घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येईल, असं सांगून दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र एसटी आणि बेस्ट बसनं  ग्राह्य धरण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Exit mobile version