Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आज जागतिक मधुमेह दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. तसंच मधुमेहविषयी माहितीची उपलब्धता या संकल्पनेवर विविध ठिकाणी कार्यक्रमांच देखील आयोजन केलं जात आहे. शरिरात योग्य प्रमाणात इंशुलीनची निर्मिती झाली नाही तर मधुमेह होतो आणि त्यावर योग्य नियंत्रण मिळवलं नाही, तर तो अधिक बळावतो आणि त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. ते रोखण्यासाठी आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांच आयोजन केलं जातं आहे.

Exit mobile version