ग्रेट ब्रिटन सरकारकडून भारतातील तरुण व्यावसायिकांना तीन हजार व्हिसा मंजूर
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : ग्रेट ब्रिटन सरकारने भारतातील तरुण व्यावसायिकांना तीन हजार व्हिसा मंजूर केले आहेत. गेल्या वर्षी मान्य झालेल्या ब्रिटन-भारत स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारीची ताकद अधोरेखित करताना, ब्रिटन सरकारने सांगितलं की, अशा योजनेचा लाभ घेणारा भारत हा पहिला व्हिसा-राष्ट्रीय देश आहे.
सरकारने यूके-इंडिया यंग प्रोफेशनल्स स्कीमला मान्यता दिली आहे जी 18-30 वर्षे वयोगटातील पदवीधर भारतीय नागरिकांना ब्रिटनमध्ये राहण्यासाठी आणि दोन वर्षांपर्यंत काम करण्यासाठी 3 हजार व्हिसा देते.